अंजनगावसुर्जी उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न बळवंत वानखडे यांच्या हस्ते झाले भुमीपूजन.

अंजनगावसुर्जी उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न
बळवंत वानखडे यांच्या हस्ते झाले भुमीपूजन.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून त्याचा भूमिपूजन सोहळा आज गुरुवारी (ता.०१) ला येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या थाटात संपन्न झाला आमदार बळवंत वानखडे यांच्याहस्ते कुदळ मारून भुमीपूजन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते अनंत साबळे यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थितीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकय क्षेत्रात क्रमांक तीन ची दैनंदिन रूग्ण नोंदणी असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे ही गेल्या दहा वर्षापासून ची मागणी होती कधी जागेची अडचण तर कधी सरकार मधील फेरबदल या कारणाने वारंवार हा प्रश्न प्रलंबित राहत होता. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांनी अनेक वेळा उपोषण केले त्यांना विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पाठिंबा मिळाला होता आणि आमदार बळवंत वानखडे पदावर आरूढ होताच त्यांनी अंजनगाव च्या या विषयाला प्रामुख्याने पाठपुराव्यानिशी हाताळले त्यामुळे अखेर येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यतेसह निधी उपलब्ध झाला व त्याच्या इमारतीच्या बांधकामाला भुमिपुजनाने सुरुवात झाली गुरुवारी (ता.०१) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाच्या उपलब्धिसाठी खासदार नवनीत राणा यांनी प्रसिद्धी करून केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवले असून खरा पाठपुरावा हा आमदार बळवंत वानखडे यांनी केला व त्याला यश मिळाले याबाबत काँग्रेस चे तालुका प्रमुख प्रमोद दाळू ,राष्ट्रवादीचे प्रदीप येवले,शिवसेनेचे विकास येवले,बाळासाहेब काळमेघ यांनी आपले विचार व्यक्त केले तर अशोक मोरे यांनी आपण गेल्या दहा वर्षापासून कश्याप्रकारे मागणीचा पाठपुरावा केला हे आपल्या गावरान शैलीत मांडले अध्यक्षीय भाषणात अनंतराव साबळे यांनी बोलतांना जनसामान्यांचा नेता म्हणून काम करत असताना आ.बळवंत वानखडे यांनी जिकरिने पाठपुरावा केला म्हणून तालुक्याचा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला याबाबत विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नालट यांनी केले तर सुत्रसंचालन धर्मराज बारब्दे यांनी केले कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अफसर बेग, शिवसेना तालुका प्रमुख कपिल देशमुख ,शहर प्रमुख राजू आकोटकर, राजू कुरेशी आशिक अन्सारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्मिता घोगरे, शिवसेनेचे महेंद्र दिपटे,समाजसेवक मालपाणी, उपजिल्हा रुग्णालयाचे कंत्राटदार वैभवजी लेंधे तसेच तालुक्यातील महविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]