पूजा मोहोड व छाया काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार
अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे
महाराष्ट्र शासनच्या महीला व बालकल्याण विभागाच्या तर्फे दि.31 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्राम स्तरावर देण्याचा शासन निर्णय पारित करण्यात होता . त्या अनुषंगाने ग्रामपंचायत विहीगाव येथे निवड समितीने पूजा अनंता मोहोड व छाया राजेश काळे या दोन कर्तबगार महिलांची निवड करून दि.31 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सरपंच जयश्री पोटदुखे यांच्या हस्ते शाल श्रीफळ , शील्ड, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच ,सर्व सदस्य , कर्मचारी ,अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , श्रीकांत पोटदुखे ,राजीक सौदागर , अनिल खलोकर ,अनंता मोहोड उपस्थित होते .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय विहीगाव चे अध्यक्ष समाजभूषण मधुकराव अभ्यंकर व सचिव व माजी पंचायत समिती सदस्य क्षितिज म.अभ्यंकर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले .
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)