आ.बळवंत वानखडे यांनी केले उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून तालुक्यातील प्रतिनीधी जिल्हा प्रतिनिधी तर अनेक सामाजिक कार्यकर्ते सह सर्व नागरिकांची होती परंतु दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या येथील पन्नास खाटांच्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालया दर्जा कधी मिळणार म्हणुन नागरीक प्रतीक्षेत होते आता इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली आणि त्याचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 1जुन रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आ. बळवंत वानखडे यांच्याहस्ते भुमीपूजन सोहळा करण्यात आला.
गेल्या दोन तिन दिवसा आधी आ. बळवंत वानखडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण रुग्णालया चे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या साठी केलेल्या पाठपुरावा म्हणुन सर्व कागद पत्र तालुक्यातील पत्रकारांना दिले होते. परंतु जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा येत्या 5 जुन ला रूग्णालयाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे म्हणजे या रूग्णालयाचे दोन वेळा भूमिपूजन होणार त्या मुळे तालुक्यातील नागरिकांना होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे दोन भूमिपूजन सोहळा पाहण्यासाठी मिळणार आहे याचे कारण म्हणजे केंद्र आणि राज्य असे सयुक्त रीत्या प्रशासकीय मंजुरी मिळाली असुन आज झालेला सोहळा व 5 जुन ला होणारा सोहळा तालुक्यातील नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे. परंतु या श्रेय लढाईत अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय पुर्ण होणार की नाही होणार याची याची जोरदार चर्चा तालुक्यातील नागरीक करत आहेत.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)