विहीगाव येथे ज्वारीच्या उभ्या पिकात शेतातील डीपी ने घेतला पेट सुदैवाने कुठलेही नुकसान नाही.

विहीगाव येथे ज्वारीच्या उभ्या पिकात शेतातील डीपी ने घेतला पेट सुदैवाने कुठलेही नुकसान नाही.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

अंजनगाव तालुक्यातील विहीगाव येथे असलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 8 दरम्यान घडली. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतिचे वातावरण निर्माण झाले होते.आग लागलेली डीपी ज्वारीच्या शेतामध्येच असल्याने शेतातील ज्वारीचे नुकसान होण्याआधीच विहीगाव येथील सरपंच जयश्री श्रीकांत पोटदुखे यांनी घटनेची माहिती अंजनगाव सुर्जी येथील अग्निशामक दलाला देताच घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून त्या आगीवर नियंत्रण मिळविण्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास अर्ध्या तास लागला.

Spread the love
[democracy id="1"]