शेवंताबाई काळमेघ कनिष्ठ महाविद्यालया मधून १२ वीत प्रथम आलेल्या कु. स्वाती चा गावकऱ्यांकडून सत्कार.
अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे
तालुक्यातील कारला येथील कु स्वाती मोहन नेटकर वर्ग बारावीच्या परीक्षेत श्रीमती शेवंताबाई काळमेघ कनिष्ठ महाविद्यालय चौसाळा येथून कला विभागात ८२.३५ % गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल कारला वासियांकडून ग्रामपंचायत सदस्य किशोर गवळी यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने तिला प्रोत्साहन देऊन सत्कार करण्यात आला तसेच तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी उमेश इंगळे , गजानन गवळी, विजय वानखडे ,नितिन दाते ,विठ्ठल, प्रज्वल इंगळे, सचिन वानखडे, सुमित गवळी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)