संत रुपलाल महाराज पायी पालखीचे रथासह पंढरपूरसाठी प्रस्थान

संत रुपलाल महाराज पायी पालखीचे रथासह पंढरपूरसाठी प्रस्थान

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

“पुंडलिक वरदे हरि विठ्ठल.श्री ज्ञानदेव तुकाराम” संत रुपलाल महाराजांच्या जयघोषात संत रुपलाल महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून मंगळवारी सकाळी ९.३० वाजता पंढरपूर कडे प्रस्थान केले. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सर्वाधिक दूरचा प्रवास करणाऱ्या, मानाच्या पालखी मध्ये संत रुपलाल महाराजांच्या पालखीने आज (दि. ३० मे)श्री विठ्ठल मंदिर संस्थान,श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून टाळ, मृदंगाच्या गजरात,आणि ‘रामकृष्ण हरि’च्या जयघोषात पंढरपूरसाठी प्रस्थान केले.टाळ, मृदंगाच्या गजराने अंजनगाव सुर्जी नगरीचे वातावरण दुमदुमले.पहाटेपासूनच सुरू झालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तयारी सुरू झाली होती. यावेळी दर्शनासाठी आणि सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी संत रुपलाल महाराजांच्या समाधीस्थळी हजेरी लावली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले.या पालखी सोहळ्याच्या परंपरेला २८ वर्षे पूर्ण होत आहेत.श्री. संत रुपलाल महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळ्यास आमदार बळवंत वानखडे ( दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्र ) यांनी उपस्थिती लावली व पालखीचे दर्शन घेतले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार चांदुर बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. राजेंद्र भाऊ याउल यांचा सत्कार आ. बळवंत वानखडे व वारकरी मंडळी यांनी केला.पालखी सोहळ्याच्या पूजनासाठी भक्त मंडळी व वारकरी भजन मंडळी उपस्थित होते. टाळ मृदुंग आणि संत रुपलाल महाराज कीं जय या जयघोषात मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.तीन दिवस अगोदरच पालखी पंढरपुरात पोहोचेलत्यामुळे वारकऱ्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचे दर्शन घेता येईल. संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असेल. यादरम्यान विविध कार्यक्रम होतील. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांमध्ये संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. कारण, पंढरपूरमध्ये लांब अंतरावरून येणाऱ्या पालख्या मध्ये आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी तब्बल ३० दिवस ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करतात.यंदा वारकऱ्यांची संख्या वाढणार त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जी शहरातून पालखी मार्गस्थ होतांना घराघरातून स्वागत झाले,पहिला मुक्काम सुर्जी शहापूरा येथील श्री मारोती संस्थान येथे होणार आहे.

Spread the love
[democracy id="1"]