साखरी येथे ३१ ला अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर व भव्य सत्कार सोहळा.

साखरी येथे ३१ ला अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर व भव्य सत्कार सोहळा.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

तालुक्यातील साखरी येथे उद्या दि.३१ ला पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत रक्तदान शिबीर व सायंकाळी ६:३० वाजता विर अहिल्यादेवी सांस्कृतिक भवन , साखरी येथे अंजनगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ तसेच किसान जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था यांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सहकार पॅनलच्या पदाधिकारी व निवनियुक्त संचालकांचा भव्य जाहीर सत्कार करण्याचे आयोजन साखरे येथील समस्त गावकरी मंडळी केला असून या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार बळवंत वानखडे ,उद्घाटक म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष तसेच सहकार पॅनलचे प्रमुख अनंतराव साबळे राहणार असून या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याची आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक विशाल पंडित तसेच समस्त साखरी येथील गावकरी मंडळांनी केले आहे.

Spread the love
[democracy id="1"]