महिला सन्मान बचत योजनेची दर्यापूर उपडागघरात उत्साहात सुरुवात

महिला सन्मान बचत योजनेची दर्यापूर उपडागघरात उत्साहात सुरुवात प्राचार्या ज्योती हावरे यांनी खाते उघडून केले उद्घाटन

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

केंद्रीय वित्तमंत्री यांनी 2023 24 या अर्थसंकल्पात महिलांना बचत करण्याची संधी मिळावी म्हणून महिला सन्मान बचत योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली त्याची सुरुवात महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ ज्योती हावरे मॅडम यांनी आपले दर्यापूर डाकघरात खाते उघडून केली सदर योजनेची वैशिष्ट्ये व त्यातून होणारा आर्थिक लाभ लक्षात घेता प्रत्येक महिलेने किमान एक तरी खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्याचे आवाहन यांनी केले तसेच पोस्ट ऑफिसच्या योजना ह्या इतर आर्थिक संस्थांपेक्षा जास्त व्याजदर देणाऱ्या आहेत पण आपला पैसा सुरक्षित राहण्यासाठी पोस्ट ऑफिस हा चांगला पर्याय असल्याचे प्राध्यापिका सौ ज्योती हावरे यांनी व्यक्त केले दर्यापूर डाग घरात महिला सन्मान योजना बरोबरच बचत खाते आरडी खाते फिक्स डिपॉझिट मासिक खाते ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुकन्या योजना ह्या सर्व खात्यावर आकर्षक व्याजदर परतावा मिळतो तसेच आपली गुंतवणूक ही इतर वित्तीय संस्था पेक्षा सुरक्षित ठेवण्याची हमी सुद्धा देते वरील योजनेसोबतच टपाल जीवन विमा ग्रामीण टपाल जीवन विमा तसेच अपघात विमा सुद्धा पोस्ट ऑफिस मध्ये काढता येतो या सर्व खात्यांचा व विमा योजनांचा लाभ नागरिकांनी आपल्या भविष्यातील आर्थिक व सुरक्षित जीवनासाठी घेण्याचे आवाहन दर्यापूर डागघराचे पोस्टमास्टर श्री थोरात सर यांनी केले तर अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा माहिती उपलब्ध केली असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले त्याचबरोबर शासकीय योजना सुद्धा पोस्ट ऑफिस मध्ये माहितीस्तव सादर केले आहेत महिलांना व मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा हेतूने याची सुरुवात करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक स्त्रीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन वसुंधरा गुल्हाने मॅडम यांनी पत्रकार परिषदेत केले आहे

Spread the love
[democracy id="1"]