सध्याचे केद्राचे सरकार हे लोकशाहीचे नसून दडपशाहीचे
सुधाकर पाटील भारसाकळे
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
सध्याचे देशाचे सरकार हे लोकशाहीचे सरकार नसून दडपशाही सरकार असल्याचे तीव्र संतापजनक भावना शहरवासीयांसह सुधाकर पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. देशाच्या महत्त्वकांक्षी प्रश्नावर डोळे झाक करुन आणि त्यावर पांघरून घालत केवळ जनतेच्या निढळाच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी हे सरकार स्वताच्या फायद्यासाठी करत आहे देशातील बेरोजगारी, प्रचंड वाढलेली महागाई,त्यात अन्न दात्याला आलेले शेतीची मशागत व पेरणीचे दिवस समोर आले असून शेतकऱ्यांना कुठल्याचं प्रकारचा दिलासा शासनाकडुन अद्याप मिळाला नाही थोड्या दिवसावर मृग नक्षत्राला सुरुवात होऊन विदर्भासह महाराष्ट्रात शेतकऱ्यांची लगीन घाई जोमात सुरू होते त्याचबरोबर बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खतांचा तुटवडा हा दर्वर्षी भासत असतो त्यावर अगोदर लक्ष केंद्रित करणे अति महत्त्वाचे असून त्या कडे डोळेझाक करुन मात्र संपूर्ण देशाचे लक्ष हे केवळ नव्या संसद भवनांच्या उद्घाटनाकडे वळवले जात आहे,जणु काही तो जनतेच्या जीवन मरणाशी स़बधित एवढा मोठा विषय आहे. आता पहा ना, छोट्या-मोठ्या प्रसारमाध्यमांवर पहाटेपासूनच उद्घाटन सोहळ्यावर विशेषकरून एकतर्फीच वृत्त प्रकाशित केले जात आहेत देशाच्या प्रथम नागरिक म्हणून महामहीम राष्ट्रपती यांना साधे निमंत्रण सुद्धा संसद भावनांच्या उद्घाटनासाठी दिले नाहीत केवळ राष्ट्रपती यांची निवड केवळ दलित म्हणून केली का ? आज तसे पाहिले तर नियमानुसार देशाचे सर्वोच्च नागरिक म्हणुन राष्ट्रपती यांनाच हा बहुमान द्यायला पाहिजे होता, देशातील विरोधी पक्षाने पण हा विषय आग्रहाचा केला होता पण केवळ एकाधिकारशाही ने व सत्तेच्चा जोरावर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचा तुरा मिळवत हे उद्घाटन पंतप्रधान यांनी पार पाडले तर विरोधकांना सुद्धा याचे औपचारिकता म्हणून व्हाट्सअप वरती संदेश पाठवल्या गेले हे लोकशाहीची थट्टा करणारे उद्घाटन असल्याचे व्यक्त झाले तर राष्ट्रपती यांना निमंत्रण नसल्याने या उद्घाटनावर विरोधकांकडून बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला आहे यामध्ये विरोधकांनी उद्घाटन अपूर्ण असल्याचे प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले आपल्या सोयीप्रमाणे संसद बांधकामाची निर्मिती केली आहे तर रंगरंगोटी सुद्धा पक्षावर आधारित केली असून या माध्यमातून सुद्धा मोदी सरकारने इतर पक्षात तेढ निर्माण केला आहे जुनी संसद भवन ही अद्यापही सुस्थितीत असून केवळ पैशाची उधळण या निर्मितीमध्ये केली गेली आहे संसद निर्मिती करणे हे सहाजिकच गौरवाची बाब आहे पण महत्वकांशी नसताना सुद्धा हे निर्माण करणे म्हणजे सत्ता असताना शहाणपण गाजवण्यासारखे झाले असल्याचे तीव्र शब्दात सुज्ञ जनतेकडून सुद्धा आपली तीव्र नापसंती मात्र मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.शेवटी सत्ते पुढे कुणाचेही शहाणं पण चालत नाही,एवढे खरे असलेले तरी जनतेच्या मनातुन हे एक कल्ली सरकार दिवसेंदिवस उतरत चालले आहे हे पण तेवढेच खरे आहे. येणार्या भविष्यात निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा शासना प्रती रोष उफाळुन येईल असे जनमानसात उघडपणे बोलल्या जात असल्याचे यावेळी बोलताना व्यक्त केले