औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दर्यापूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन
औ.प्र. संस्था, दर्यापूर दि. २० मे २०२३ रोजी संपन्न झालेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअरशिबीराचे आयोजन औ.प्र. संस्था, दर्यापूर / अंजनगाव सुर्जी यांचे वतीने शेतकरी सदन, दर्यापूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. आ. श्री. बळवंतभाऊ वानखडे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यांत आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मा.श्री. के. एस. विसाळे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार मा. श्री. बुंदीले व मा. श्री. बाळासाहेब वानखडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून सौ. निलिमा काळे, प्रशिक्षक पंजाबराव देशमुख, विकास प्रबोधिनी, अमरावती व श्री गजाननजी कोरे संचालक, राष्ट्रमाता जिजाउ करिअर कौन्सलिंग, अमरावती , श्री. सचिन ठक ई.मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यांत आली. संस्थेचे प्राचार्य, श्री. आर. टी. शेगोकार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व त्याचे महत्व व उददेश समजून सांगितले. मा.आ.श्री. बळवंतभाऊ वानखडे यांनी उद्घाटनपर भाषन केले, ज्यामध्ये यूवा उमेदवारांनी व्यावसायिक शिक्षणाकडे वळून स्वतःची प्रगती साध्य करण्यांचा कानमंत्र दिला. तसेच माजी आमदार मा. श्री. रमेशजी बुंदीले यांनी १० वी १२ वी नंतर उमेदवारांनी आपल्या आवडीच्या व्यवसायामध्ये करिअर करावे असे मत व्यक्त केले. श्री. जगदिश महानकर, श्री. बाळासाहेब वानखेडे यांनी सुध्दा मुलांना मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते सौ निलिमा काळे यांनी समाजातील तरुण पिढीनी रोल मोडेलची वरवर माहीती न घेता त्यांनी समाजात आपले स्थान कसे मिळवावे कुठल्याही अपयशाला न घाबरता धैयाने सामोरे जावे याची सखोल माहीती दिली. तसेच श्री. गजाननजी कोरे यांनी इतिहासविषयक सामान्यज्ञानाचे प्रश्न युवक व युवतीना विचारून त्याच सामान्यज्ञान तपासले व शिक्षण पुर्ण झाल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री. सचिन ठक यांनी १० वी १२ वी नंतरच्या सर्व उपलब्ध संधीचे सोन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज करीअर शिबिराचा लाभ जवळपास ४८८ विद्यार्थी व पालक यांनी घेतला सदहुँ कार्यक्रमाला श्री. सुधिर धर्मे, श्री. मनीष मेल, श्री अतुल च-हाटे, श्री. जगदिश महानकर, श्री. शेषराव करूले श्रीमती सुषमाताई जळमकर, पत्रकार श्री गजाननजी देशमुख व अमोल कंटाळे आदी मान्यवर उपस्थित करण्यांत आली
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)