संगीता दूधे व आशिक अन्सारी यांना राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार प्रदान 

संगीता दूधे व आशिक अन्सारी यांना राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार प्रदान

अंजनगांवसुर्जी ता प्रतिनिधी दि.२८

सन २०२३ चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरणाचा सोहळा,ज्या शेतातुन उत्कृष्ट प्रतीची केळी उत्पादीत केली त्या मातीतच निसर्गरम्य वातावरणात मान्यवरांच्या हस्ते काल दि.२७ ला पार पडला. गेल्या सतरा वर्षापासूनच्या राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे संयोजक प्रकाशदादा साबळे यांच्या वतीने शेती च्या क्षेत्रांत असामान्य कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो,यावेळी हा गौरव तालुक्याचे कर्तुत्ववान, निर्भीड व कष्टकरी महिला शेतकरी संगीता दूधे यांना तर उच्चांकी ,निर्यातक्षम व उत्कृष्ट केळी उत्पादन भारतातील विविध राज्यात निर्यात करणारे युवा कृषी उद्योजक शेतकरी आशिक अन्सारी यांना देण्यात आला .शेतकरी सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर व पौर्णिमाताई सवाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात महिलांचे भरीव योगदान असल्यामुळे कृषी क्षेत्र भरारी घेत असल्याचे व हा सन्मान पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे श्रमाचा व त्यागाचा सन्मान होय असे प्रतिपादन केशवराव मेतकर यांनी व्यक्त केले यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे संयोजक प्रकाश साबळे यांनी मार्गदर्शन करताना विपरीत परिस्थितीत शेतात राब-राब राहून एका महिला शेतकऱ्याने श्रमातून केली अश्रूची फुले ही बाब शेतकरी समाजासाठी प्रेरणा देणारी आहे,आपले मतव्यक्त करुण समाज घटकातील शेती क्षेत्रात शेतकऱ्यांचे हीतास सर्वोत्तम कार्यकरनाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सन्मान करणे आमचे दाईत्व आहे असे मत व्यक्त केले पुरस्कार प्रदान सोहळ्यास
प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिमाताई सवाई, ऐनुल्ला खान,अविनाशजी पांडे,प्रदीप देशमुखा,उद्योजक प्रवीन नेमाडे, बायर हाउसचे संचालक जगदीश सारडा,अ.कलाम आ.कलीम,मिर्झा ज़हीर बेग,राजु कुरेशी,ज्ञानेश्वर काळे, दत्तात्रय किटुकले, शेहजाद कुरेशी ,खालीकशेठ,वैभव खारोडे, सचिन लांडे, जेयश सेतवाल, चेतन गीते सह शेतकरी वर्ग उपस्थित होता.

Spread the love
[democracy id="1"]