उपजिल्हा रुग्णालयाचे खासदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये- आमदार बळवंत वानखडे
सागर साबळे अंजनगावसुर्जी सुर्जी ता प्रतिनिधी दि.२९
अंजनगाव सुर्जी उपजिल्हारुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली असताना खासदार नवनीत राणा यांनी ५ जूनला उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रम ठेवला असून हे भूमिपूजन म्हणजे श्रेय घेण्याच्या प्रयत्न असल्याचे आज दिनांक २९ ला स्थानिक विश्राम भवनात पत्रकार परिषद मध्ये आमदार बळवंत वानखडे यांनी पत्रकारांसमोर मांडले.
अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे . विधानसभेत सर्वप्रथम मी हा विषय मांडला , तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अंजनगाव सुर्जी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय होणे किती आवश्यक आहे यासाठी मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला आणि अखेर २६ एप्रिल २०२२ ला अंजनगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता देऊन दोन कोटी तीन लक्ष रुपये इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर केले . त्यानंतर आता कामाला सुरुवात झाली असताना मा.खासदार नवनीत राणा यांनी परस्पर दि.५ जूनला अंजनगाव सुर्जी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून हा भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे श्रेय निव्वळ लाटण्याचा प्रयत्न आहे . गेल्या तीन वर्षात सतत पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालय आणले हे तालुक्यातील जनतेला माहीत असून त्यामुळे दिनांक १जूनला उपजिल्हा रुग्णालयाचा रीतसर भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही आमदार वानखडे यांनी सांगितले. मा. खासदार श्रेय घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीचे पत्र सुद्धा ग्रामपंचायतला देतात. केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळूनच निधी मिळत असला तरी हे संपूर्ण राज्य शासनाचे काम असल्याचे सांगत एक तारखेला होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मी मा.खासदारांना सुद्धा निमंत्रित करणार असल्याचे आमदार वानखडे यांनी सांगितले.
त्यामुळे आता हा भूमिपूजनाचा प्रश्न तालुक्यात चांगलाच गाजणार असल्याचे आणि एक तारखेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर खासदारांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला आमदार बळवंत वानखडे यांची काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख, सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)