अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी सन्मान सोहळ्यात सामाजिक एकतेचे दर्शन.

अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी सन्मान सोहळ्यात सामाजिक एकतेचे दर्शन.

अंजनगाव सुर्जी येथील केळी उत्पादक शेतकरी मा. आशीक अन्सारी, व महिला शेतकरी श्रीमती संगीता दुधे या दोन्ही शेतकरी भाऊ बहिणीस राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार बहाल.मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना” या उक्तीनुसार राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी पुढाकार घेऊन अंजनगाव सुर्जी येथील दोन्ही शेतकरी भाऊ- बहिणींचा एकत्रित सन्मान असा सामाजिक एकता अबाधीत राखण्यासाठी शेतकरी धर्माचे पालन केल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष मा. केशवराव मेतकर यांनी व्यक्त केले.हिंदू मुस्लिम समाजातील शेतकरी कुटुंबाचा एकत्रित व कौटुंबिक सन्मान सोहळा सामाजिक आरोग्य अबाधित राखण्याचे मोठे पाऊल असल्याचे मत ग्रामगीताचार्य मा.सौ.पौर्णिमाताई सवाई यांनी व्यक्त केले.हा सन्मान सोहळ्यात प्रत्येक समाजातील शेतकरी वर्ग ह्या कौतुकाचा व आनंदाचा क्षणाचा आस्वाद घेत असल्याचे चित्र प्रत्येकजण पाहत होते.सदर सोहळ्यात मा.भैय्यासाहेब निचळ, अरुणराव खारोडे, मा. अविनाश पांडे, मा.ज्ञानेश्वर काळे, मा.अनुल्ला खान, राजू कुरेशी, मा.जाहीर भाई, मा.कलीम भाई, दत्तात्रय किटूकले, अक्षय साबळे मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Spread the love
[democracy id="1"]