शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळेना, अनेक संकटाना मात करून शेतकरी आपल्या कामात खंबीर,

शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळेना,

अनेक संकटाना मात करून शेतकरी आपल्या कामात खंबीर,
हिवरखेड प्रतिनिधी,
अर्जुन खिरोडकार,

हिवरखेड परिसरात अनेज प्रकारचे शेती उत्पादन शेतकरी पिके काढतात, परंतु कदाचित एखाद्याचा पिकाला भाव लागला तर लागला नाहितर गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या या पिकांना भाव मिळतच नाही ,किती मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनि पैशाची गुंतवणूक करून कांदा पिकांचे निर्माण केले परंतु शेवटी काद्यानेच शेतकऱ्याचा वादा केला शेतकऱ्यांच्या काद्याला फक्त ५ रुपये किलो ने मागणी करण्यात आली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, शेतकऱ्यांनवर अनेक प्रकारचे संकटे चालूच राहतात ,वरून नापिकी, खाली पिकांना भाव नाही, तरीही शासन जशी पाहिजे तशी आर्थिक मदत शेतकऱ्यांना करत नाही, थोड्याफार मदतीने शेतकऱ्यांना फक्त दिलासा मिळतो, अनेक संकटाचा सामना करून शेतकरी खंबीरपणे दुसरे पीक काढण्यास सक्षम राहतो याच हिमतीने शेतकऱ्यांची आस जिवंत राहते आज नाही तर उद्या चांगले पीक मिळनार, चांगला भाव येणार अशी आस व जिद्द मनासी बाळगून शेतकरी राबत राहतो तरीही मात्र चागले भाव मिळत नाही, सध्या आलेल्या ज्वारी या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र हिवरखेड परिसरात दिसून येत आहे, ज्वारी पीक हे ३ दिवसापासून विक्रीसाठी शेतकऱ्यांनि बाजारात मांडलेले शेवटी पोत्यात भरून आपल्या घरी ठेवण्यात सुरुवात करत असल्याचे दिसून येत आहे, अनेक शेतकऱ्यांना वाटते हे आपले पीक विकून पिकासाठी लागलेला खर्च काढू इतरांना उधारीचे पैसे देऊन टाकू,पण मात्र होते याउलट योग्य भाव मिळत नाही शेतकरी पुन्हा, पुन्हा चिंतेत सापडतो, शेतकऱ्यांच्या या मेहनती पिकांना योग्य तो भाव द्या अशी मागणी हिवरखेड शेतकरी वर्ग करीत आहे,,

Spread the love
[democracy id="1"]