परमहंस यात्रा कंपनीने दृष्टी नसलेल्या भाविकांचे बाबा केदारनाथ चे दर्शन घडवले

परमहंस यात्रा कंपनीने दृष्टी नसलेल्या भाविकांचे बाबा केदारनाथ चे दर्शन घडवले

बाळासाहेब नेरकर कडून

अकोला – उत्तराखंड देवभूमी मध्ये स्थित असलेले गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ चारधाम यात्रा करण्याकरता देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनाला जातात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील कमल किशोर जी लाटा यांची दृष्टी गेली पण बाबा केदारनाथ, बद्रीनाथ दर्शनाची अभिलाषा मनामध्ये होती आणि म्हणून आंतरराष्ट्रीय यात्रा नियोजनामध्ये नावलौकिक झालेल्या परमहंस यात्रा कंपनी चे संचालक ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांच्याशी कमल किशोर लाटा यांनी संपर्क साधला व मला आपल्या सोबत उत्तराखंड चार धाम यात्रेला यायचे आहे पण मला अजिबात दिसत नाही कृपया माझे दर्शन घडून द्यावे ही विनवणी केली असता यात्रेमध्ये त्यांना सहभागी करण्यात आले व गंगोत्री ,यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ या चारही धामाला मंदिरातील विश्वस्तांची संपर्क साधून थेट व्हीआयपी गेटमधून कमल किशोर जी लाटा यांचे सह कुटुंब दर्शन घडवून दिले विशेष कमल किशोरजी लाटा यांना विचारण्यात आले आपण एवढ्या दूर आले अवघड अशी यात्रा आपण करत आहात पण आपल्याला इथे आल्यानंतर देव दिसणार नाही तर त्यांचे उत्तर असे मिळाले मला जरी देव दिसत नाही पण मी इथे आलेला आहे हे मात्र देवाला दिसणार आहे आणि हा भाव मनात ठेवून एवढ्या दूर महाराष्ट्रातील एक भाविक पोहोचला उत्तराखंड येथील सर्व देवस्थानांनी त्यांचे मनापासून स्वागत केले मनात जर दृढनिश्चय असला तर कुठलेही कार्य अशक्य नाही हे या बाबींवरुन सिद्ध होते असी माहीती परमहंस यात्रा कंपनीचे संचालक ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांनी केले

Spread the love
[democracy id="1"]