मौलाना आझाद नगरपरिषद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा 93 टक्के निकाल निकालाची यशस्वी परंपरा कायम,
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
नगरपरिषद दर्यापूर द्वारा संचालित मौलाना आझाद नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे कुमारी निम्रा सदफ रहमत खान 80 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आलेली आहे झुबिया इराम ना जिमखान 78% टक्के गुण घेऊन द्वितीय तर हादिया नौशाबा 70% गुण घेऊन उत्कृष्ट यश संपादन केले आहे कॉलेजमधून एकूण प्रविष्ट विद्यार्थी 57 होते उत्तीर्ण विद्यार्थी 53 आणि विशेष प्राविण तीन उत्तम श्रेणी पाच आणि द्वितीय श्रेणी 29 उत्तीर्ण विद्यार्थी 16 आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य इरफान अहमद तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)