सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शासनास नोटीस..

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शासनास नोटीस..

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करणेबाबत राज्याच्या वित्त विभागाने आदेश निर्गत केले असून जून-२०२३ महिन्याच्या वेतनासोबत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भ नि नि खात्यामध्ये आणि DCPS/NPS लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचे आदेशित आहे.तरी पण आज पर्यंत ही थकबाकी शिक्षकांना मिळाली नाही ती मिळावी या करीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यव्यापी धरणे/निर्देशन करण्याची नोटिस शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंञी दिपक केसरकर यांना दिली आहे अशी माहीती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी राजेश सावरकर यांनी दिली आहे.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान होत असताना जिल्हा परिषद अधिनस्थ प्राथमिक शिक्षकांना अजूनही अनेक जिल्ह्यात दुसऱ्या आणि तिसन्या हप्त्याचे प्रदान झालेले नाही. यासाठी शासनाकडे वारंवार विनंती/निवेदने करून आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या देय/अनुज्ञेय थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान होण्याबाबत शासन / प्रशासन स्तरावर असलेले औदासिन्य संतापजनक आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना देय हप्त्यांचे प्रदान अद्यापही न करण्याचे कोणतीही कारणे समर्थनीय नाही. अंमलबजावणी स्तरावर शासनाने विलंबाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे प्रदान होणार नसून आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यासह पुढील कार्यवाही अविलंब होण्यासाठी यंत्रणांना आदेशित करणे गरजेचे आहे. ठोस आणि अत्यावश्यक कार्यवाहीकडे दुर्लक्ष करत केवळ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन शासनाकडून इतर कार्यवाही न होणे सर्वथा गैरवाजवी, अनाकलनीय, अतार्किक असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची ठाम भूमिका आहे असे नोटिस मध्ये म्हटले आहे.शासनाकडून पुढील सात दिवसात कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा नोटीस सादर केली आहे.जिल्हावर आंदोलन करण्याची तयारी शिक्षक समिती पदाधिकारी यांनी करावी अशी विनंती शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,राज्य शिक्षक नेते उदय शिंदे ,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत (सोलापूर), आनंदा कांदळकर (नाशिक), विलास कंटेकुरे (उस्मानाबाद)राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील (सांगली)राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर (पुणे)

राज्य संघटक – राजेंद्र खेडकर (बीड), सुरेश पाटील (धुळे)
राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर (अमरावती),राज्य प्रवक्ता नितीन नवले (संभाजीनगर)राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार (लातूर) राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील (रायगड), सतिश सांगळे (वाशिम)राज्य ऑडिटर पंडित नागरगोजे (हिंगोली)जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर (यवतमाळ)उर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली (जळगाव) विभागीय अध्यक्ष पुणे अर्जुन पाटील मराठवाडा श्याम राजपूत,अमरावती गजानन गायकवाड,,नागपूर किशोर डोंगरवार पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम,पुणे विभागीय चिटणीस विष्णुपंत रोकडे,पुणे विभागीय संघटक चंद्रकांत डोके,पुणे विभागीय संपर्क प्रमुख सुनील शिंदे,मराठवाडा विभागीय,उपाध्यक्ष विकास पुरी,प्रसिद्धी प्रमुख सतिश कोळी,अमरावती विभागीय उपाध्यक्ष गोपाल सुरे नागपूर विभागीय उपाध्यक्ष योगेश ढोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य केदूजी देशमाने,बाबासाहेब लाड, महदेव माळवदकर पाटील, अनिल नागोठकर,व समस्त विभागीपदाधिकारी,जिल्हा,तालुका पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे असे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

Spread the love
[democracy id="1"]