सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा
निकाल १००% तसेच कला विभागाचा निकाल १००%….
गायत्री संतोष डाबरे. ९२.५०% तर वैष्णवी उमेशराव हागोणे ८५.८3% घेवून संस्थेमधुन प्रथम.
सागर साबळे
अंजनगाव सुर्जी ता प्रतिनिधी दि.२५
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून स्थानिक ख्यातनाम सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल १००% लागला असून कला विभागाचा निकाल १००% लागला आहे. एच. एस. व्ही. सी. चा निकाल ७५.७५% लागला आहे. विज्ञान विभागातून गायत्री संतोष डाबरे हिला ९२.५०% गुण प्राप्त साले असून ती कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर कला विभागातून वैष्णवी उमेशराव हागोणे ८५.८3% गुण प्राप्त झाले असून ती कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली आहे. विज्ञान विभागामधून प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी तर कला विभागामधून प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी आले आहेत, विज्ञान विभागातून प्रथम श्रेणीत. २८ तर कला विभागातून प्रथम श्रेणीत २२ विद्यार्थी-विद्यार्थीनी आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश संगई उपाध्यक्ष डॉ. उल्हास संगई सचिव विवेक संगई सहसचिव अजय संगई, प्रसाद संगई, प्राचार्य विकास घोगरे, उपमुख्याध्यापक राजेश वैदय, पर्यवेक्षक निलेश उटाळे तथा सर्व शिक्षक-शिक्षीका यांनी अभिनंदन करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेनी या वर्षी सुद्धा उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवली आहे,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)