चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ क .म.वि. विज्ञान शाखेचा 100% निकाल
अंजनगावसुर्जी ता प्रतिनिधी सागर साबळे
महाराष्ट् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पूणे द्वारा आयोजित वर्ग १२ वी च्या परीक्षेत चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ क .म.वि. च्या विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून याही वर्षी विद्यालयाने आपली १०० % निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .परीक्षेकरीता बसलेले सर्व विद्यार्थी चांगले गुण घेवून उत्तीर्ण झाले असून यामध्ये कृष्णा तिवाने याने ७१ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर अनूज पवार याने ७ ० % गुण घेवून दूसरा क्रमांक व सचिन तिखीले याने ६५ % गुण घेवून तिसरा क्रमांक मिळविला आहे . सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले . अंशतः अनुदानित तत्वावर सुरू असणाऱ्या या शाखेचा दरवर्षी १०० % निकाल लागत असल्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे .
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)