आदिवासी महिलांच्या मदतीला धावून आले शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट

आदिवासी महिलांच्या मदतीला धावून आले शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

अंजनगाव तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे शेतीच्या कामानिमित्त मध्यप्रदेशांमधून काही मजूर आलेले होते काम संपवून त्या मजुरांना टाटा एस वाहनांमध्ये मध्यप्रदेशातील धाबा येथे त्यांच्या घरापर्यंत सोडून देण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र बहिरम जवळील टोल नाक्यावर टाटा एस वाहन अधिकाऱ्यांनी थांबविले. त्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने सदर टोल अधिकाऱ्यांनी वाहन ताब्यात घेतले कोणत्या टाटा एस वाहनामध्ये बसलेले आदिवासी महिला मजूर यांना वाहनातून उतरून दिले. मध्यरात्रीचे एक वाजले असताना सदर आदिवासी महिला हे रस्त्याने कसे जाणार असा प्रश्न टाटा एस मधील चालकाने संबंधित टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना विचारला परंतु टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांनी कुठलीही माणुसकी न दाखवता आमच्यावर अन्याय केल्याचे आदिवासी महिलांनी म्हटले. या संदर्भात अमरावती जील्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांना मध्यरात्री बारा वाजता सुमारास फोन द्वारे माहिती मिळाली की बहिरम जवळील टोल नाक्यावर आदिवासी महिलांना गाडीतून खाली उतरून दिले व जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही सदर माहिती मिळतात शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी मध्यरात्रीच टोल नाक्यावर जाऊन त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले व आदिवासी महिलांना तात्काळ त्यांच्या घरापर्यंत पोहोचून देण्याची व्यवस्था करावी अन्यथा टोल नाक्यावर मध्यरात्रीच आंदोलन सुरू करण्यात येईल असा पवित्र जिल्हाप्रमुखांनी घेतलेला होता अखेर टोल नाक्यावरील वाहतूक निरीक्षक योगिता राणे यांनी संबंधित ताब्यात घेतलेले वाहन कायदेशीर चलन देऊन सोडून दिले. व आदिवासी मजूर हे त्या वाहनांमध्ये बसून आपल्या घरी गेले आदिवासी मजुरांच्या मदतीला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट हे धावून आल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले.

Spread the love
[democracy id="1"]