बालसंस्कार शिबिरातून आदर्श समाजनिर्मिती होते अनंतराव वडतकार ठाणेदार उरळ

बालसंस्कार शिबिरातून आदर्श समाजनिर्मिती होते
अनंतराव वडतकार ठाणेदार उरळ
बाळासाहेब नेरकर कडून
बाळापुर

श्री जागेश्वर मंदिर बोरगाव वैराळे येथे दोन वर्षापासून दि १ मे ते २० मे पर्यत उन्हाळी सार्वांगीण बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यातून बालवयात मुलांवर संस्कार केल्या जातात त्याचबरोबर शरीर सुदुढ ठेवण्यासाठी योगासने शिकविण्याचे काम केल्या जाते हीच गोष्ट आदर्श समाजनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यी व उपस्थित मातापालकासमोर व्यक्त केले
ते पुढे म्हणाले की आज गावागावात सुसंस्कार मुलावर बालवयात होत नसल्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे त्यामुळे मी ठाणेदार म्हणून काम पाहत असताना दररोज माझ्या समोर येत असलेले वेगवेगळे गुन्हे देखील वाढले आहेत गुन्हेगारांमध्ये बाल गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे याला कारण म्हणजे पालकांचे आपल्या पाल्याकडे कुठलेच लक्ष नाही सुसंस्कार नसल्यामुळे काही शिक्षण घेऊन पैसा कमविण्यासाठी परदेशात गेलेल्या मुलांचे आईवडील आयुष्याची संध्याकाळ वृध्दाश्रमात घालवीत आहेत अनेक सुशिक्षित लोक आईवडिलांच्या अंतिम दर्शनासाठी येऊ शकत नाहीत ही शोकांतिका आहे ज्यांना आपल्या आयुष्यात शेवटचे दिवस समाधानानं जगायचे असतील त्यांनी आपल्या मुलांना सुशिक्षित करण्यापेक्षा सुसंस्कारीत करण्यावर भर दिला पाहिजे मी देखील शुकदास महाराज हिवरा आश्रमातील संस्कार शिबिराचा विद्यार्थी असल्याची भावना मार्गदर्शनाला पूर्णविराम देताना व्यक्त केली
यावेळी सरपंच कल्पना विनायक वैराळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल वैराळे,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राजेश्वर वैराळे, रामराव महाराज शेळके, शिबिराचे मुख्याध्यापक गणेश महाराज साठे,शिक्षक राधेशाम महाराज राऊत, निलेश महाराज बांगर, मंगेश वैराळे, सुनील गावंडे, पांडुरंग बहाकर,प्रदीप वाकोडे, हरिभाऊ दांगटे, प्रमोद वैराळे, पुरूषोत्तम शेळके, बाळू पाटील वैराळे, दिपक वैराळे, आशिष वैराळे, ज्ञानेश्वर शेळके, शिवाजी वैराळे, विजय वैराळे, ज्ञानेश्वर वैराळे आदीसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]