अतिरिक्त शिक्षणामुळे लहान बालकांचे उन्हाळी बालपण हरपले आई-वडिलांचा शैक्षणिक अट्टाहास कारणीभूत.

अतिरिक्त शिक्षणामुळे लहान बालकांचे उन्हाळी बालपण हरपले आई-वडिलांचा शैक्षणिक अट्टाहास कारणीभूत.

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

पूर्वी उन्हाळा म्हटलं की मुलांचा सुटीच्या कल्पनेने आनंद गगनात मावेनासा होत होता.साधारणत: शैक्षणिक क्षेत्रातील उन्हाळी परीक्षा म्हणजेच शेवटचा चित्रकला किंवा संगीत विषयाचा पेपर दिला की उन्हाळी सुट्टीची चाहूल लागत होती व वर्षभराचा केलेल्या अभ्यासाचा शैक्षणिक लेखाजोखा १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या सुखद वातावरणात समजत असे, त्यात पास नापास अथवा सवलतीने पास अशा स्वरूपाची गुणांची विभागणी होत असे प्रथम आलेल्यांना अनेक प्रोत्साहन पर बक्षीस मिळत होती तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलाचे चेहरे पडत असत, व पाल्यां बद्दल नामुष्की स्वताला वाटुन घेत असत तर गुरुजन त्यांचे सांत्वन करत असत तर सवलतीने पास झालेल्यांना फुल नाहीतर फुलांच्या पाकळी मानसिक सारखे समाधान वाटत असे
आता ह्या सर्व शैक्षणिक बाबी संपुष्टात आल्या आहेत,केवळ पालकांच्या मुलांच्या प्रति शिक्षणा बाबत आकांक्षा अधिक वाढल्या आहेत. अमक्या च्या मुलांनी तमक्याचे शिकवणी वर्ग लावले त्यामुळे आपणही आपल्या मुलाला त्या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश करू ,ह्या मानसिक अट्टाहासामुळे मुलांचे बालपण हरुन जाऊन मामाचे गाव, नदी नाले, मोकळा निसर्ग, संगीत, ग्रामीण खेळ, उनाडक्या ईत्यादी उन्हाळ्यातील बालकांचे आवडते कौटुंबिक कार्यक्रम या सर्व सामाजिक जीवनाला विसर पडत चालला आहे केवळ उन्हाळी सुट्टी ही नावालाच असून फाउंडेशन कोर्सेसवर पालकांनी अधिक भर दिला आहे मुलांवर केवळ शिक्षण आणि भविष्यातील नोकरी याविषयीचा वारंवार दबाव केल्या जात असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे हक्काचे बालपण पूर्णपणे ह्या आधुनिक काळात संपूर्ण हर ऊन गेले आहे,हे दुर्दैवाने सत्य आहे, भविष्यात शासना कडुन विद्यार्थ्यांना हक्काची असलेली उन्हाळी सुट्टी ही ऐच्छिक असेल का ? असा ही प्रश्न आता सर्व सामान्यांना पडणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलगा घरीच राहतो त्यामुळे कुठेतरी त्याला व्यस्त होण्यासाठी अतिरिक्त शिकवणी वर्गात प्रवेश घेत आहेत तर बालपणीच डॉक्टर, इंजिनिअर ,पायलट,या शिक्षणाचे बीजारोपण पालक करत आहेत त्यामुळे लहान बालके सुद्धा पालकांच्या अट्टहासाला कंटाळून जीवन संपवण्याचा मार्गाचा अवलंब करत असल्याचे दिसत आहे,ही नियतीची क्रुर थट्टा थांबविल्या गेली पाहिजे,पालकांनी ही आपल्या इच्छेचे ओझे लहान बालकांच्या माथी मारु नये , इतर हुशार मुलां सोबत आपल्या पाल्याची स्पर्धा करु नये. परमेश्वराने सर्वांना सारखी बुद्धी दिलेली नसते यांचे भान ठेवावे. व बालकाचे बालपण हिरावुन घेण्याचे पाप करु नये असे सुचवावे वाटते ‌.लहानपण देगा देवा शब्दांकन गौरव टोळे

Spread the love
[democracy id="1"]