पंजाब डख : नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक मु.पो गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी. आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो २२ आणि २३ मे ला राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे. हा अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या शेतीचे कामे करून घ्यावीत.
त्याच्यानंतर ३१ मे , 1 जून आणि २ जूनला राज्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. तुम्ही हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ८ जूनच्या नंतर राज्यात लगेच मान्सूनचा आगमन होणार आहे. म्हणून सर्व शेकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे.
शेतकऱ्यांनो एकंदरीत महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्यांच्या शेतात खूप कामे राहिलेले आहेत .म्हणजे काही जणांचा भुईमूग काढायचा राहिलेला आहे. तुम्ही काय करा आता तुमच्याकडे १० ते १२ दिवस शिल्लक राहिलेले आहेत.
या १२ दिवसामध्ये तुम्ही शेतातील कामे करून घ्या कारण की २२ मे आणि २३ मेला एक अवकाळी पाउस येणार आहे. त्याचात तुमच्या लग्नाच्या काही तारखा आहेत त्याच्यात तुमचे २ ते ३ दिवस जाणार आहेत.