नवनिर्वाचित बाजार समितीच्या सभापती उपसभापतीचा पदग्रहन सोहळा गुरुवारी

नवनिर्वाचित बाजार समितीच्या सभापती उपसभापतीचा पदग्रहन सोहळा गुरुवारी

सहकार प्रेमी सह काँग्रेस प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आमदार बळवंत वानखडे,सुधाकर पाटील भारसाकळे यांचे आवाहन

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक रणसंग्राम पूर्ण होऊन. सभापती उपसभापतीची नेमणूक प्रक्रिया सुद्धा यशस्वी संपन्न झाली. यामध्ये बाजार समितीच्या सभापती पदी सुनील पाटील गावंडे. तर उपसभापती पदी राजू पाटील कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाजार समितीच्या नवनियुक्त सभापती व उपसभापतीचा. पदग्रहण समारंभ सोहळा आमदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली. सहकार महर्षी सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी सकाळी ठीक नऊ वाजता बाजार समिती प्रशासकीय कार्यालयात साजरा होणार आहे .तरी या नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना पुढील यशस्वी व शेतकरी हितार्थ कारकीर्द पार पाडण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य, व ग्रामपंचायत , सरपंच, उपसरपंच अडते व्यापारी हमाल काँग्रेस प्रेमी .सहकार प्रेमी,काँग्रेस पक्षाचे ,पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या पदग्रहण सोहळ्याला मोठ्या संख्येने . उपस्थित राहण्याचे आवाहन .आमदार बळवंत वानखडे .सहकार महर्षी सुधाकर पाटील भारसाकळे. यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Spread the love
[democracy id="1"]