पोहरा पूर्णा ते गोविंदपूर कसारी रस्ता पालकमंत्री पानंद रस्ता योजनेतून करण्याकरिता शासनाला मूर्त मिळेल का खोलापूर

पोहरा पूर्णा ते गोविंदपूर कसारी रस्ता पालकमंत्री पानंद रस्ता योजनेतून करण्याकरिता शासनाला मूर्त मिळेल का खोलापूर

प्रतिनिधी अतुल भटकर
खोलापूर येतुन जवळ असलेल्या ग्राम पोहरा पूर्णा येथील पोहरा पूर्णा ते गोविंदपूर हा पानंद रस्ता व्हावा याकरिता या परिसरातील शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून शासनाकडे मागणी आहे सदर हू रस्ता नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतूक करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होते तेव्हा शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांना त्यांचे बी बियाणे शेतापर्यंत वाहतूक करता यावी याकरिता हा रस्ता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे पोहरा पूर्णा ग्रामपंचायत मार्फत या रस्त्या संदर्भात अनेकदा निवेदने व ठराव संबंधित विभागाला देण्यात आले परंतु अजूनही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही प्रशासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहे समोर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करून शेतकऱ्याला न्याय द्यावा अशा प्रकारची लेखी मागणी दिनांक 13 2 2023 रोजी माननीय तहसीलदार भातकुली आणि या मतदारसंघाच्या आमदार व माजी पालकमंत्री तथा माननीय एडवोकेट यशोमती ताई ठाकूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे या परिसरातील शेतकरी तथा सरपंच गजानन लांजेवार श्रीकृष्ण बोबडे वासुदेव ठाकरे गजानन ठाकरे अनिल निहाटे इत्यादी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे..

Spread the love
[democracy id="1"]