अंजनगाव सुर्जी येथील महिला शेतकरी श्रीमती संगीता दुधे यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर

अंजनगाव सुर्जी येथील महिला शेतकरी श्रीमती संगीता दुधे यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर

अंजनगावसुर्जी ता. प्रतिनिधी सागर साबळे  दि.१९

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान व शेतकरी नेतृत्व मा.प्रकाशदादा साबळे यांच्या गेल्या १७ वर्षापासूनच्या शेतकरी गौरव सोहळाच्या उपक्रमाद्वारे सन २०२३ चा मानाचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार (महिला शेतकरी गट) श्रीमती. संगीता दुधे यांना जाहीर झाला आहे. हा सन्मान दिनांक २७ मे २०२३ ला अंजनगाव सुर्जी येथे शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा व ग्रामगीताचार्य सौ पौर्णिमाताई सवई यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न होणार आहे.श्रीमती संगीताताई दुधे अत्यंत कष्टातून शेतीमध्ये अधिक उत्पन्न घेतात एक सक्षम महिला शेतकरी म्हणून त्यांचा परिसरात नाव लौकिक आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे माननीय भैय्यासाहेब निचळ, वैभव खारोडे, चेतन गीते, जयेश दादु , आकाश खारोडे,आशिष शिंदे, अमित गोंडचवर,राज साबळे, संतोष देशमुख देवानंद टेकाडे, सुयोग खाडे, अक्षय गवळी, शरदभाऊ लोणकर आदी मान्यवर शेतकरी मंडळींनी अभिनंदन केले आहे सक्षम महिलांनी शेती व्यवसाय व शेतीपूरक उद्योग या क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेतली पाहिजे, महिला शेतकऱ्यांच्या शेतकरी यांच्या कष्टाचा सन्मान झाला पाहिजे ही आमची आग्रही भूमिका असल्याचे मत मा.प्रकाशदादा साबळे यांनी व्यक्त केले.

Spread the love
[democracy id="1"]