श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या मुक्त कृषी शिक्षण केंद्राला अ दर्जा श्री शिवाजी शिक्षण संस्था,
अमरावतीद्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत येणाऱ्या मुक्त कृषी शिक्षण केंद्राला अ दर्जा प्राप्त झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उच्चविद्या विभूषित शिक्षकवृंद, उपलब्ध पायाभूत सुविधा,अभ्यासक्रमानुसार प्रक्षेत्राची उपलब्धता, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वातानुकूलित ग्रंथालय, विविध कृषीशी निगडित कंपनीच्या महाविद्यालयातच मुलाखती या सर्व निकषांमुळे हा दर्जा महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे.श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती ची स्थापना सन 2003-04 मध्ये झाली असून सन 2010-1 1मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची सोय व्हावी याकरिता मुक्त कृषी शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या पदवीकरिता 480 विद्यार्थी प्रवेशित असून मुक्त कृषी शिक्षण केंद्रात 438 विद्यार्थी शिकत आहेत. या केंद्रात माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी अधिष्ठान ,कृषी व्यवसाय व्यवस्थापन कृषी पत्रकारिता ,उद्यानविद्या, भाजीपाला ,फळबाग, फुलशेती व प्रांगण उद्यान असे विविध, प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. दहावीनंतर तीन वर्ष व बारावीनंतर दोन वर्ष कालावधीचे हे अभ्यासक्रम आहेत. या केंद्राचे केंद्रप्रमूख म्हणून डॉ. शशांक देशमुख व केंद्र संयोजिका म्हणून प्रा. सौ. कल्पना पाटील समन्वयन करतात. या केंद्राने अ दर्जा प्राप्त केल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख व समस्त कार्यकारीणी यांनी केंद्र प्रमूख व केंद्र संयोजिका यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)