ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे
राष्ट्रीय डेंग्यू दिनी जनजागृतीपर मोहीम
प्रतिनिधि संजय भटकर
तेल्हारा तालुका
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला तर आपण डेंग्यू व चिकुनगुन्या तसेच इतर कीटकजन्य आजारांना दूर ठेऊ शकतो जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.देवराम लांडे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.बाळासाहेब वाबळे,यांच्या आदेशानुसार, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.व्ही. टाक,डॉ.मंदार कळंबेळकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक व्ही.पी.राठोड यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय डेंग्यू दिवस 16 मे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम चाळीसगाव शहरातील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रात कंटेनर सर्वेक्षण करून,दूषित कंटेनर मध्ये अबेट हे औषध टाकण्यात आले तसेच काही कंटेनर रिकामे करण्यात आले,आणि एक दिवस कोरडा दिवस पाळण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कीटकजन्य आजाराविषयी पॉम्लेट वाटप करून माहिती देण्यात आली.नंतर शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.तेंडुलकर ,उपाध्यक्ष डॉ.पवार ,डॉ.दायमा यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शनआरोग्य सेवक दिपक ठाकरे यांनी केले.पुढे बोलतांना आरोग्य सेवक ठाकरे यांनी माहिती देताना सांगितले की,राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा का केला जातो आणि या दिवसाचे महत्व विषद करून डेंग्यू तसेच इतर सर्व कीटकजन्य आणि जलजन्य आजाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला तर आपण डेंग्यू व चिकुनगुन्या तसेच इतर कीटकजण्य आजारांना दूर ठेऊ शकतो. यासाठी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडे करुनच त्यात पाणी भरणे योग्य असते. तसेच पाणी साठवुन ठेवतांना नेहमी पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवणे आवश्यक आहे. एडिस डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसरातील स्वच्छता आवश्यक आहे. बऱ्याचदा घरात, गॅरेजमध्ये, कार्यालयात रोज न लागणाऱ्या वस्तू बाहेर उघड्यावर कचऱ्यात फेकल्या जातात किंवा छतावर ठेवल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी साचते व आठवड्यानंतर डासांच्या अळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरुपयोगी सामानाची वेळीच विल्हेवाट लावणे अथवा ते झाकून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचणार नाही. घराच्या छतावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.लक्षणे काय एडिस इजिप्टी डास चावल्यानंतर रुग्णात तापाची लक्षणे दिसायला लागतात. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, उलटी-मळमळ व अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसताच त्वरीत रक्ताची तपासणी करून घ्यावी.डेंग्यूचे निदान झाल्यास वेळेत औषधोपचार करावा, जेणेकरून डेंग्यूमुळे येणारा मृत्यू टाळता येऊ शकतो असे ठाकरे म्हटले कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न व्हावा यासाठी आरोग्य सेवक सुरेश देवकर,संदीप जाधव,दिपक ठाकरे,विकास सोनवणे,चंद्रकांत चौधरी,बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना – गणेश,स्वप्नील,लहू चव्हाण,जितेंद्र राठोड,शेख इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.वैद्यकिय अधिकारी, सहा.जिल्हा हिवताप अधिकारी महेंद्र पाटील, विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहायक,आरोग्य सहायक धनराज सपकाळ, तालुका आरोग्य पर्यवेक्षक हमीद पठाण ,आरोग्य सहायक ममराज राठोड,अमोल इंगळे,विपुल लोणारी,जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालातील,चाळीसगाव शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील,ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील ,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले……
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)