श्री गजानन महाराज पादुका संस्थान बाल संस्कार शिबिराचा समारोप

श्री गजानन महाराज पादुका संस्थान बाल संस्कार शिबिराचा समारोप

प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन

दि. 10-6-2023: श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव द्वारा आयोजित श्री संत झामसिंग महाराज सर्वांगीण बाल संस्कार निवासी शिबिराचा समारोप झाला. या धक्का धक्कीच्या जीवनात प्रत्येक मातापिता आपल्या पुत्राच्या भविष्या बद्दल चिंतातुर असतात. आपल्या पश्च्यात त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण झाले पाहिजे याची सदैव चिंता राहते. हीच बाब लक्षात घेता श्री गजानन महाराज पादुका संस्थान विश्वस्त मंडळाने व शिबीर समितीने संत श्री झामसिंग महाराज सर्वांगीण बाल संस्कार निवासी शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबीर दि. 21-4-2023 शुक्रवार रोजी पासून ते 10-5-2023 पर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण वीस दिवस चालले. या शिबिरा मध्ये 70 विद्यार्थ्यांचा समावेश झाला होता.
दि. 10-5-2023 बुधवार रोजी या शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ह.भ.प.श्री. नंदकिशोर महाराज कोल्हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार शुकदास महाराज गाढेकर पाटसुल, ह.भ.प.श्री अशोक महाराज जायले वडाळी, श्री ब्रम्हचारी महाराज संस्थान श्री क्षेत्र पानेट चे अध्यक्ष मनिष मोडक, ह.भ.प.श्री मंगेश महाराज ठाकरे याची उपस्थिती लाभली. तसेच संस्थानचे अध्यक्ष विलास बहादूरे, उपाध्यक्ष श्री गणेशजी ढोले, कोषाध्यक्ष विजय ढोरे तसेच पादुका संस्थांचे सर्व विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.या शिबिराचे शिक्षक ह.भ.प. श्री गजानन महाराज खेट्टे, ह.भ.प. श्री करण महाराज व्यवहारे, ह.भ.प.श्री सुदर्शन महाराज खडसने यांनी शिबीरा मध्ये मुलांना दिलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षित प्रमुख पाहुणे यांच्या समोर सादर केले. या प्रत्यक्षिता मध्ये मुलांनी संस्कृत श्लोक, पाऊल्या, भारुड, मृदुंग वादन, लाठीकाठी, गायन करून दाखवले. तसेच समारोपाच्या आधल्या दिवशी शिबिरातील मुलांची संत नगरी मुंडगाव मधून पायदळ यात्रा काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुभाष रोठे यांनी केले व प्रास्ताविक ह.भ.प.श्री. सुदर्शन महाराज यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पादुका संस्थान चे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले. विश्वस्त मंडळाकडून उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व बालसंस्कार शिबीर यशस्वी करणाऱ्या व्यवस्थापन समिती चे सदस्य नरेश ठाकरे गुरुजी, सुनिल सदार, दिनकर बहाकर,विश्वासराव म्हैसने,छगन अंबळकार हिंमतराव कडु, अशोकराव देवगीरे, तसेच अतुल काळे, मनोज तायडे, शुभम थाटर यांचा सुद्धा विश्वस्त मंडळाकडून सत्कार करण्यात आला. श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, शिबिराची व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर समारोप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांसह, पालक, गावकरी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]