घराघरात बहारदार बाग फुलविण्याचा मिळणार कानमंत्र
गंध मातीचा सुगंध फुलांचा माती मिश्रण कार्यशाळा
अमरावती गार्डन क्लब आणि श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन
ग्रीष्म ऋतू अर्थात उन्हाळा म्हणजे खरे तर उकाड्याचा व प्रचंड उन्हाचा परंतु तो तितकाच आवश्यकही असतो. विविध फुलझाडे फुलविणारे नागरिक या काळात पूर्व तयारी करत असतात ज्या मध्ये प्रामुख्याने विचार होतो तो म्हणजे माती मिश्रणाचा. बागकाम किंवा लँडस्केपिंगसाठी निरोगी माती तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी माती बनवण्याची कार्यशाळा हा एक आदर्श मार्ग आहे. माती बनवण्याच्या तंत्राचा अनुभव घेण्याचा आणि तज्ञांकडून शिकण्याची हि एक उत्तम संधी आहे. प्रत्येक ऋतुमानानुसार वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असणारा अमरावती गार्डन क्लब अनेक कार्यशाळांच्या आयोजनावर भर देत असतो म्हणूनच बाग प्रेमींच्या मागणीला अनुसरून येत्या शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी अमरावती गार्डन क्लब आणि श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालया द्वारा “गंध मातीचा सुगंध फुलांचा” माती मिश्रण कार्यशाळा (प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून) रामपुरी कॅम्प, स्थित महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रम अपार मेहनत घेऊन सुनियोजित, पद्धतशीर आणि शिस्तशीर राबविण्याकरिता गार्डन क्लब सुपरिचित असून या कार्यशाळेच्या माध्यमातून देखील तीच गुणवत्ता राखल्या जाणार आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती आणि विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव (खंडे.) या महाविद्यालयांच्या सहयोगाने हि कार्यशाळा पार पडणार आहे.
या कार्यशाळेत माती परीक्षण, मातीची रचना, माती पुनरुज्जीवन, माती मिश्रण आणि बायो-कंपोस्टिंग सोबतच मातीचे हेल्थ कार्ड कसे तयार करावे या विषयांवर शास्त्रोक्त माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना प्रक्रियेची चांगली माहिती मिळू शकेल. माती मिश्रण तयार करणे कार्यशाळेत सहभागींना प्रत्यक्ष अनुभवाचा अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. “मातीचे आरोग्य” किंवा “बायो कंपोस्टिंग” सारखे विस्तृत विषय घेण्यात आले आहेत. यात सहभागींनी स्वतःची माती तयार करण्यासाठी हाताशी असलेल्या सामग्रीची सूची तसेच क्रियाकलाप बागकार्य तसेच वनस्पतिशास्त्राच्या तज्ञ डॉ सुचिता खोडके, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव (खंडे.) तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.द्वितीय सत्रात घरात असलेल्या जुन्या मातीची वापर कसा करावा तसेच गुणवत्तायुक्त नवीन माती तयार करतांना मिश्रण कसे करावे? त्याचप्रमाणे मातीचे परिक्षण आणि पुनरुज्जीवन याबाबत सौ शितल चितोडे, सहाय्यक प्राध्यापक, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कृती करून दाखविणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता बागप्रेमी नागरिकांना नोंदणी करण्यासाठी गार्डन क्लबच्या www.agca.webs.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजक डॉ रेखा मग्गीरवार( (9822576066) तसेच डॉ गजेंद्रसिंह पचलोरे, (9422957763) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉ.दिनेश खेडकर यांनी केले आहे.
बॉक्स:१ बागप्रेमी नागरिकांनी सुदृढ आणि रंगीबेरंगी फुलझाडे लावून त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा याकरिता माती मिश्रण या महत्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.- डॉ.शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती
बॉक्स:२पर्यावरण संवर्धनासाठी नवनविन संकल्पना राबविणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक दशकांपासून बागकार्य करीत असतांना गाठीशी असलेला अनुभव आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या संयोगातून प्राप्त केलेल्या माहितीचे रुपांतर घराघरात बाग फुलविण्यासाठी झाल्यास कार्यशाळेचे फलित साधल्या जाईल. या आयोजनाचा नागरिक अवश्य लाभ घेतील अशी खात्री वाटते. डॉ. सुचिता खोडके, सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, श्री विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव (खंडे.)
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)