अडगाव बु येथे विशाल जम्मा जागरण
प्रतिनिधि संजय भटकर
तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु येथे दि.१८ मे रोजी श्री रामदेवबाबा च्या विशाल जम्मा जागरणाचे आयोजन केले असून,येथील रामदेवबाबा सेवा समिती मागील १५ वर्षांपासून विशाल जम्मा जागरणाचे आयोजन करत आहे.राजस्थान येथील सुप्रसिद्ध देव श्री रामदेवबाबा यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. यांच्या साक्षात परचे आहेत.यांचे मुख्य मंदिर राजस्थान राज्यातील रामदेवरा येथे आहे.अकोला जिल्ह्यातील व तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु येथे दि १८मे च्या सायंकाळी ६ वाजता पासून तर प्रभू इच्छा असे पर्यंत येथील नवीन बालाजी मंगल कार्यालय गांधी चौक येथे विशाल जम्मा जागरण चे आयोजन केले आहे,हा जम्मा जागरण संस्कार, सत्संग व शुभ चॅनेल चे सुप्रसिद्ध भजन व जम्मा गायक श्री दिनेश शर्मा धामनगाव रेल्वे यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे या सोबतच अखंड ज्योत,जन्म कथा,लग्न, झाकिया पण दाखविण्यात व सांगण्यात या येणार आहे,येथील रामदेवबाबा सेवा समिती असे आयोजन मागील १५ वर्ष पासून करत आहेत या वर्षी या विशाल जम्मा जागरणाचे मुख्य यजमान अभिषेक जैन व सौ. चंचल जैन, हरीओम व्यास व सौ.रमादेवी व्यास हे आहेत या विशाल जम्मा जागरण चा लाभ रामदेवबाबा च्या चाहत्यांनी घ्यावा तसेच परिसरातील सर्व भक्तांनी घ्यावा असे आव्हान आयोजक रामदेवबाबा सेवा समिती,राजस्थानी महिला मंडळ अडगाव बु यांच्या कडून तसेच हिवरखेड,जामोद,माटरगाव,वानखेड, पातुडाँ बु, जळगाव, सोनाळा, तेल्हारा,संग्रामपूर, माळेगाव यांच्या कडून केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)