अखेर नालवाडा पुनर्वसन रस्त्याचे तसेच नालवाडा आराळा पांधण रस्ताचे उद्घाटन. नालवाडा येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

अखेर नालवाडा पुनर्वसन रस्त्याचे तसेच नालवाडा आराळा पांधण रस्ताचे उद्घाटन.
नालवाडा येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

दर्यापूर तालुका प्रतिनिधी आदेश खांडेकर

गेल्या कित्येक वर्षापासून नालवाडा पुनर्वसन येथील नागरिकांना, तसेच समस्त नालवाडा येथील शेतकऱ्यांना नालवाडा ते आराळा पांदन रस्त्याने गारा तूडवावा लागत होता. ह्या रस्त्याची दैनंदिन अवस्था एवढी खालावली होती की साधी बैल जोडी ही शेतामध्ये नेता येत नव्हती .शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये धान्य खते डोक्यावर वाव्हावे लागत होते.कितीक वेळा या रस्त्याने ट्रॅक्टर व बंड्या पलटी सुद्धा झाल्या होत्या.तसेच नालवाडा पुनर्वसन येथील नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना पायदळ गाटा तुडवावा लागत होता.मात्र आता नालवाडा पुनर्वसन तसेच नालवाडा ते आरडा पांदन रस्ता चे उद्घाटन झाल्याने सर्वांची चिंता मिटली आहे. या रस्त्याचा उद्घाटन सोहळा दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत भाऊ वानखडे, काँग्रेस कमिटी दर्यापूर अध्यक्ष श्री सुधाकर पाटील भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर,अभिजीत देवके, सुनील गावंडे, सरपंच निर्मलाताई चव्हाण, सदस्य छायाताई खांडेकर,सुभाष रूपनारायन डॉक्टर प्रकाश चिंचोळकर,विनोद वरघे आधी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]