एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सची यशाची परंपरा कायम

एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सची यशाची परंपरा कायम

इयत्ता दहावीचा 99% निकाल

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

स्थानिक दर्यापूर येथील एकविरा शाळेचा 99% निकाल लागला असून वर्ग दहावी मध्ये 108 विद्यार्थ्यांपैकी 104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्ग मिळवले आहेत सदर एकविरा शाळा ही तालुक्यातील एकमेव सीबीएसई मान्यताप्राप्त असून दरवर्षी यशाची परंपरा ही कायम असते विद्यार्थ्यांचा सराव वर्गशिक्षकासह विषय शिक्षक हे घेत असतात त्याचबरोबर त्यांना अतिरिक्त मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत असते विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्तचे संपूर्ण श्रेय शिक्षक विषय शिक्षक सह शाळेच्या प्राचार्या यांना दिले आहे भविष्यात सुद्धा 100%च्या पलीकडे अशाच प्रकारचा निकाल अपेक्षित असेल असे यावेळी प्राचार्या उज्वला गायकवाड यांनी व्यक्त केले गुणानुक्रमे विद्यार्थी दिया शिंगणे 96.2 देवाश्री धांडे 96% जयेश कावरे 95.6% मयुरी दूधंडे 95.4% श्रेयश बोबडे 94.4% यश धोटे 93.4% श्रेया लोहिया 92.8% श्रीयांश गावंडे 92.8% सोहम टाले 92.8% सिद्धांत बैस 92.4% अनुराग साबळे 92% अरमान बेथारिया 91.2% हे असून उत्तीर्ण झालेल्यां विद्यार्थ्यांचे शालेय विश्वस्त मंडळांनी कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Spread the love
[democracy id="1"]