बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंचाला गाडी भेट

 

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंचाला गाडी भेट

संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी

अकोट: बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील सरपंच दिगंबर पिंप्राळे यांना स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते चाबी देऊन गाडी भेट देण्यात आली.पिंप्राळे घरदार वीज नसणारे एकमेव सरपंच होते.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केल्या जातो.वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच दिगंबर पिंप्राळे यांना टीव्हीएस एक्सएल १०० ही गाडी भेट म्हणून देण्यात आली.थेट जनतेतून निवडून येऊन सरपंच पदापर्यंत पोहचणारे सरपंच दिगंबर पिंप्राळे यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे वाहनाचे साधन नव्हते.ते स्वतःपायी वाटचाल करीत होते.परंतू बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी सरपंचाला दिलेली गाडी अनोखी भेट ठरली.यावेळी ओबीसी नेते बालमुकुंद भिरड,ओबीसी नेते गोपाल राऊत,ओबीसी नेते ॲड.संतोष रहाटे,वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे,जि.प.उपाध्यक्ष र

सुनिल फाटकर,भिमराव पळसपगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]