जि. प.शाळा शेलू बोंडे येथील रोनक सदानंद वानखडे”आकाशवाणीच्या शाळेबाहेरची शाळा अभिनव उपक्रम

जि. प.शाळा शेलू बोंडे येथील रोनक सदानंद वानखडे”आकाशवाणीच्या शाळेबाहेरची शाळा कार्यक्रमामध्ये
रोनक सोबतच त्च्याच्या आईचीही घेतली नागपूर आकाशवाणी केंद्रावर मुलाखत

शाळेबाहेरची शाळा हा अभिनव उपक्रम मा .विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर ,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जि .प.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जातो.त्या अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बोंडे गावातील जि .प.वरिष्ठ प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वी चा विद्यार्थी रोनक सदानंद वानखडे व त्याची आई छाया सदानंद वानखडे रा.लाईत यांची मुलाखत घेतली.शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाचा ४५४ वा भाग गुरुवार दिनांक ११ मे 2023 ला सकाळी 10.35 वाजता प्रसारित झाला आहे. हा अभिनव उपक्रम संपूर्ण कोविड काळापासून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. नागपूर आकाशवाणी ‘अ’ (512•8) केंद्रावरून मंगळवार, गुरुवार, व शनिवारला हा कार्यक्रम प्रसारित होतो.यामध्ये अंगणवाडी ते 8 वी च्या वर्गाचा अभ्यास घेतला जातो. मुले माता पालकांच्या मदतीने तो अभ्यास पूर्ण करतात. या कार्यक्रमात रोनक ला “कोणतेही चार अंक घ्या व त्या पासून वेगवेगळ्या संख्या बनवा व वाचून दाखवा.” हा अभ्यास दिला होता व त्यावर त्याच्याशी चर्चा केली. रोनक ने चांगल्या प्रकारे सविस्तर माहिती सांगितली . रोनकच्या आईने पण आपल्या मुलाबद्दल ,अभ्यासाविषयी व सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले.या करिता लाईत गावच्या सरपंच सौ विजयश्री प्रकाश वानखडे ,प्रकाश वानखडे ,उप सरपंच सौ निशा विकास सौंदळे ग्राम पंचायत सदस्य शेलू बोंडे ,शाळेचे मुख्याध्यापक किरण गावंडे,सतीश वसू,सहाय्यक शिक्षिका गावंडे,कावरे तसेच लाईत शाळेचे मुख्याध्यापक अनुप दळवी,शाळा समिती अध्यक्ष सुर्यकांत डिके यांनी रोनक चे कौतुक केले व प्रथम प्रतिनिधी सुनील इंगळे ,भावेश हिरूळकर, वैभव बाजड,अमोल नाईक ,स्वाती गावंडे,दिपमाला काळे,तेजस्विनी वासनकर हे तालुक्यातील गावा – गावात हा उपक्रम राबवित आहेत.

Spread the love
[democracy id="1"]