एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सची देवश्री तुळशीदास धांडे CBSE दहावी मध्ये ९६ % गुण घेऊन प्राविण्य प्राप्त
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
दर्यापूर:: नुकताच सीबीएसई पॅटर्न दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये दर्यापूर येथील कु. देवश्री तुळशीदास धांडे हि सीबीएसई दहावीच्या परीक्षेमध्ये 96 टक्के गुण घेऊन ती अव्वल राहिली आहे. देवश्री धांडे ही दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रीलियंटची विद्यार्थिनी असून तिचे आई-वडील दोन्ही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. वडील तुळशीदास धांडे हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दर्यापूर तालुका अध्यक्ष असून दी. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे संचालक आहेत तर आई प्रणिता कराळे ह्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कळमगव्हाण येथे शिक्षीका आहेत. देवश्री धांडे ही प्रत्येक क्षेत्रात पुढे असून कोरोना काळात सुद्धा तिने सामाजिक उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तिचा अमरावती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला होता. देवश्री धांडे हिने तिला मिळालेल्या या प्राविण्या बद्दल याचे श्रेय आई- वडील, आजी -आजोबा व एकविरा स्कुल ऑफ बिलियन्ट शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक गजाननराव देशमुख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अँड.अभिजीत देवके, पंजाबराव देशमुख बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पाटील भारसाकळे, प्रतिभा साहित्य संघाचे तालुकाध्यक्ष विनोद शिंगणे, उपाध्यक्ष प्रवीण कावरे, तालुका संघटक तथा राजटेक कम्प्युटरचे संचालक राजू पाटील ढोले, फ्रेंड एकता ग्रुप चे अध्यक्ष संदीप पाटील अरबट, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक संजय नागे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराळ, क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ, निलेश पारडे, व समस्त दर्यापूरकर तिचे कौतुक व अभिनंदन करत आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)