दर्यापूर नगरपालिकेने पावसाळ्या अगोदर नाल्यांची साफसफाई करावी अवकाळी पावसाने नाल्या तुडुंब सामाजिक कार्यकर्ते आतिष शिरभाते यांची मागणी
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
दर्यापूर नगरपरिषद मध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशासक कार्यरत आहे प्रशासक व मुख्याधिकारी एकच असल्यामुळे पूर्ण जबाबदारी प्रशासकावर म्हणजेच मुख्याधिकारी यांच्यावर आली आहे पालिकेत एकाधिकार शाही असून सुद्धा दर्यापूर नगरपरिषदची विकासाकडे वाटचाल हवीतशी होत नसताना दिसत आहे पावसाळा तोंडावर आला उन्हाळ्यातच पावसाळा दिसू लागला मात्र नगरपरिषद सफाईबाबत एकदमच उदासीन धोरण राबवत आहे मेन रोडच्या नाल्या संपूर्ण कचऱ्यांनी भरलेल्या आहेत नुकताच पाऊस भरपूर झाल्याने नाल्यातील पाणी रोड लागत असलेल्या किराणा गोडाऊनमध्ये शिरत आहे दुकानात किराणा व इतर साहित्याची नासधूस होत असून रात्रीच्या वेळी वादळी स्वरूपाचा पाऊस आल्याने लाखो रुपयाचे नुकसान शहरातील व्यवसायिकांचे होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही तरी नगरपरिषद दर्यापूरने युद्ध पातळीवर मेन रोडच्या नाल्या गटारी साफ कराव्या असे सामाजिक कार्यकर्ते आतिष शिरभाते यांनी व्यक्त केले असून लवकरच ते मुख्याधिकारी यांना भेटून लेखी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)