नाफेड चना खरेदी पूर्ववत सुरू श्री.ॲड अभिजित रा. देवके
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळेदिनांक 15-4-2023 ला शासनाने दिलेला लक्षांक संपल्यामुळे नाफेड खरेदी ही बंद करण्यात आली होती. परंतु शासनाने लक्षांक वाढवल्यामुळे नाफेड खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तथापि दिनांक 10-04-2023 ते 15-04-2023 या दरम्यान SMS आलेले परंतु खरेदी न केलेल्या शेतकऱ्यांचा माल हा 15-05-2023 पर्यंतमोजून घेण्यात येणार आहे. व त्यानंतर पुढील SMS देऊन पुढील शेतकऱ्यांचा माल मोजून घेण्यात येणार आहे. असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त् झाल्याचे तहसिलदास साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहेत. आज दि. 08.05.2023 पासुन दि. दर्यापुर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संघाच्या दर्यापूर व खल्लार या केंद्रावर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.ॲड.अभिजीत रामदासपंत देवके तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर चे प्रशासक/सहाय्यक् निबंधक श्री यादव साहेब, सचिव श्री.मातकर साहेब, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री राजेंद्र गावंडे संस्थेचे कर्मचारी व शेतकरी यांच्या उपस्थितीत वाढीव उद्दीष्ठ् खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)