खिराळा शेत शिवारातील शेतात एका काळविटाचा मृत्यू विष बाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय.
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दिनांक ०७/०५/२०२३ रविवार रोजी खिराळा शेत शिवारातील शेत सर्वे नंबर-९१ मध्ये अनिल मेमनकर यांच्या शेतामध्ये काळवीट मृतावस्थेत दिसल्याचे श्रीकांत काळमेघ व संजय हिरुळकर यांना आढळून आले.याबाबतची माहिती चौसाळ्याचे पोलीस पाटील शाम काळमेघ यांना दिली त्यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी दिली असता पोलिसांनी या घटनेची माहिती वनविभाग कार्यालय दहिगाव रेचा येथील कर्मचारी कैलास इंगळे यांना दिली.घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून मृत काळवीटाचा पंचनामा करून मृत काळवीटाला शवविच्छेदनासाठी परतवाडा येथे सोबत घेऊन गेले.सदर काळवीटाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून विष बाधेने काळविटाचा मृत्यु झाला असावा अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी येई पर्यंत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काळमेघ, दयाराम मुरापे,शशिकांत काळमेघ, गौरव काळमेघ हे लक्ष ठेवून होते.या परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून या प्राण्यांमुळे शेतकऱ्याचे खुप नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली, पुढील तपास वनविभाग अधिकारी पी. एस. भड यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जे. पालियाड करत आहेत.