माननिय जिल्हाधिकारी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांचे शिष्ट मंडळ मा.जिल्हाधिकारी अमरावती यांना दी 8/05/2023 रोजी भेटले
नियमीत कर्ज भरणारे हजारो शेतकरी महात्मा जोतीराव फुले प्रोत्साहन पर योजने पासून वंजित आहे. त्यामूळे समधीत प्रशासनाने हात वर केल्या मुळे नियमित कर्ज भरणारा शेतकरी हवालदिल झालेला आहे.या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशभाऊ साबळे यांचा नेतृत्त्वात मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरील अंन्याय दूर करावा अशी विनंती केली.
तसेच रासायनिक खताचा वाढत्या भावा मुळे नियंत्रण ठेवण्याबाबत कार्यवाही करावी ही विनंती करण्यात आली.शेतकर्यांचे शिष्ट मंडळ विभागीय सहनिबंधक यांना भेटून निवेदन दिले.या प्रसंगी शेखर अवघड, संजयभाऊ भुयार, अनुला खान,सुनीलभाऊ अग्रवाल, प्रवीण माहोरे, निलेश माहोरे,अमितभाऊ कूचे, शशीकांत बोंडे, न्यानेश्वर काळे, उमेश महिंगे,कमल साखरे , ऋषिकेश चांगोले, उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)