शहर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाणेदार संतोष ताले यांच्यासमोर आव्हान शहरात घरफोडी व भुरट्या चोरांच्या संखेत वाढ

शहर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाणेदार संतोष ताले यांच्यासमोर आव्हान

शहरात घरफोडी व भुरट्या चोरांच्या संखेत वाढ

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

गेल्या महिनाभरात संतोष ताले यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेताच रस्ते वाहतूक अतिक्रमण या महत्त्वाकांक्षी विषयाला हात लावत शहरात दमदार कारवाई सुरू केली तर शहरात इतर राज्यातून व बाहेरगावावरून व्यवसाय करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुद्धा सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून दर्यापूर शहरात घरफोडी मंगळसूत्र चोरणारी टोळी व आंबट शौकिनांच्या संकेत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे रात्र पाळीमध्ये पोलिसांची पेट्रोलिंग जर असती तर ह्या छोट्या-मोठ्या घटनांना आळा बसला असता हे तितकेच खरे दर्यापूर बनोसा बाभळी भागामध्ये दिवसभर बंद असलेल्या घरांची चोरांच्या वतीने पाहणी करून रात्री ते घर निशाण्यावर ठेवून ते फोडल्या जाते अशा घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीमध्ये पोलिसांनी वाढ केल्यास याचा नक्कीच घरफोडी वाचवण्यासाठी फायदा होईल असे नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे ठाणेदार संतोष ताले यांच्यासमोर अशा घटनांना आळा घालण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे पुढील कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात कोणती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले

Spread the love
[democracy id="1"]