दर्यापूर वकील संघाच्या निवडणुकीत समता पॅनलचा दणदणीत विजय अध्यक्षपदी धर्मेंद्र आठवले विराजमान

दर्यापूर वकील संघाच्या निवडणुकीत समता पॅनलचा दणदणीत विजय अध्यक्षपदी धर्मेंद्र आठवले विराजमान

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

गेल्या आठ दिवसापासून दर्यापूर न्यायालयात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आज 6 मे रोजी दर्यापूर न्यायालयात दर्यापूर वकील संघाची निवडणूक संपन्न झाली अधिवक्ता नामदेव थर्डक अधिवक्ता जोशी सर अधिवक्ता प्रसाद महाजन अधिवक्ता गोमाशे सर यांच्या मार्गदर्शनात समता पॅनलची निर्मिती केल्या गेली असता पूर्ण नऊ जागेवर दणदणीत समता पॅनल विजय झाला अध्यक्ष पदासाठी अधिवक्ता धर्मेंद्र आठवले , उपाध्यक्ष अधिवक्ता रियाज घाणीवाले, सचिव अधिवक्ता निशिकांत पाखरे, सहसचिव अधिवक्ता नरेंद्र पवार, कोषाध्यक्ष अधिवक्ता प्रशांत गणोरकर, सदस्य अधिवक्ता छाया सुरजूसे,सदस्य अधिवक्ता हर्षवर्धन कोलखेडे सद्स अधिवक्ता दिनेश देशमुख, सद्स अधिवक्ता शिरीन परवीन मो जमिल हे सर्वाधिक मते घेऊन बहुमताने निवडून आले आहेत या निवडणुकीचे संपूर्ण कामकाज निवडणूक अधिकारी अधिवक्ता आशिष बावणेर व सह निवडणूक अधिकारी अँड वैभव इंगळे अजय भडांगे विलास नवलकार दिनेश आगरकर यांनी यशस्वी पार पाडले निवडणुकीचा निकाल जाहीर होताच न्यायालयात समता पॅनलच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला न्यायालयाचे कामकाज गतिमान करण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केले यावेळी न्यायालयातील समस्त कर्मचारी रुंद न्यायालयातील अधिवक्ता हे मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]