जि.प.शाळा काकरखेडा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न. पाहुले चालती शिक्षणाची वाट खोलापूर प्रतिनिधी अतुल भटकर

 

खोलापूर येतुन जवळ असलेल्या काकरखेडा येते आज दि.२८/०४/२०२३ रोज शुक्रवार ला पं. स.भातकुली अंतर्गत जि.प.प्राथमिक मराठी शाळा काकरखेडा येथे शाळास्तरीय शाळा पूर्व तयारी ‘पाहिले पाऊल’ मेळावा संपन्न झाला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून,प्रतिमेला हारार्पण करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी,शारीरिक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी व मार्गदर्शन असे सात स्टॉल लावण्यात आले होते वरील स्टॉल च्या माध्यमातून सन २०२३-२०२४ मध्ये जे विद्यार्थी वर्ग १ ली.मध्ये दाखल होणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्यात आले होते या मेळाव्याला. विनोद बगाडे ( उपाध्यक्ष शा.व्य.स.),.दिपक मंडासे (माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती),दाखल पात्र विद्यार्थी यांचे माता पालक सौ. आरती मंडासे , सौ.ज्योती मंडासे, सौ.जिजा बगाडे,सौ.पूजा मावळे उपस्थित होत्या तसेच .सुनिल हेडाऊ (मुख्याध्यापक), कु. सुनंदा नागरगोजे मॅडम(स शि) उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]