एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल येडके असे या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. शीतल येडके (३५) या गेल्या दीड वर्षांपासून आजारी रजेवर होत्या. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
झोन 6 चे डीसीपी म्हणाले, मुंबईतील नेहरू नगर येथील रहिवासी असलेल्या महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला. सध्या एडीआरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आणि काहीही संशयास्पद सापडले नाही. तपास चालू आहे. शीतल येडके या मुंबईतील नेहरू नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यांचा मृतदेह घरातच होता. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शीतल येडके यांचा मृतदेह या घरात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एएनआयशी बोलताना डीसीपी झोन हेमराज राजपूत म्हणाले, ‘आम्हाला एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह नेहरू नगरमधील तिच्या निवासस्थानी सापडला. हा अपघाती मृत्यू मानून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला काहीही मिळालेले नाही. तरीही संशयास्पद. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जाईल.”
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)