<p>वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर शहरातील शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्याने गेल्या 12 तासांपासून नागपूरच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे …काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यानंतर नरेंद्र नगर, श्री नगर , छत्रपती चौक , मानेवाडा, उत्तर नागपूर मधील काही भागात अजूनही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही … महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.</p>
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)