Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, शरीरसुखाची मागणी करत एका राजकीय नेत्याने महिलेला चारचाकी गाडीतच बेदम मारहाण केली आहे. माझ्यासोबतच शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकी देखील यावेळी आरोपीने पिडीत महिलेला दिल्याचे समोर आले आहे. 22 एप्रिल रोजी लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला गेटजवळ ही घटना घडली असून, या प्रकरणी राजकीय नेता जयकिशन कांबळे (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) याच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कांबळेवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “जयकिशन कांबळे याने पीडित महिलेस फोन करुन भेटण्यासाठी बोलावून घेतले. दरम्यान महिला तिच्या मामाच्या मुलीसोबत कांबळे यास भेटण्यास आली. तेव्हा कांबळे याने महिलेला कारमध्ये बसण्यास सांगितले. महिला कारमध्ये बसल्यावर कांबळे याने तिला, माझ्यासोबतच संबंध ठेव असं म्हटले. तसेच तू माझ्यासोबत चल, तू मला पाहिजे आहेस. जर का तू माझ्यासोबत आली नाहीस तर, तुला भोसकून टाकीन अशी धमकी देखील महिलेला दिली. त्यानंतर त्या महिलेला गाडीतूनच बसून डीमार्टमध्ये घेऊन गेला.
गाडीतच केली बेदम मारहाण…
महिला डीमार्टमध्ये गेल्यानंतर तिला बाहेर येण्यासाठी उशीर झाल्याने कांबळे संतापला. तसेच डीमार्टमधून उशिरा बाहेर आल्यामुळे कांबळे याने महिलेला आधी शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीतच हातचापटाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या दोन्ही डोळ्यालाही मार लागला आहे. त्यामुळे संबधित पीडित महिलेने थेट पोलिसात धाव घेऊन, या प्रकरणी तक्रार देऊन गुन्हा केला आहे. तर पुढील तपास छावणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील बलात्काराचा गुन्हा…
आरोपी जयकिशन कांबळे हा राजकीय नेता असून, तो एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्यावर एका महिलेच्या फिर्यादीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांबळे याने पीडित विवाहित महिलेला लग्नाचे तसेच घर देण्याचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केला. ज्यात पीडिता गरोदर राहिली. मात्र महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता, कांबळेने तिच्या पोटात लाथ मारुन तिचा गर्भपात केल्याचा आरोप महिलेने केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
‘या’ तीन अफवांमुळे झाला छत्रपती संभाजीनगरमधील राडा; SIT च्या तपासात महत्त्वाची माहिती समोर
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)