श्री प्रेम किशोर सिकची व माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन साजरे

श्री प्रेम किशोर सिकची व माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन साजरे

अमरावती – स्थानिक अमरावती येथील गणेशदास राठी छात्रालय समिती द्वारा संचालित श्री प्रेम किशोर सिकची विद्यालय व माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात विविध स्पर्धेत भाग घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या अविष्काराने सर्वांची मने जिंकली .
या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.वसंतकुमारजी मालपाणी उद्घाटक म्हणून आदरणीय श्रीमती प्रियाताई देशमुख (शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अमरावती) तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्नेहसंमेलना निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री ओमप्रकाशजी लड्डा तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती कल्पना बारवकर (डीसीपी पोलीस आयुक्तालय अमरावती ) श्री निखिलजी मानकर( उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अमरावती ) हे उपस्थित होते.तसेच विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे पदाधिकारी लाभले होते. स्नेहसंमेलन निमित्त आयोजित स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला अशा विद्यार्थ्यांना याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य -श्री.राजेश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Spread the love
[democracy id="1"]