एस बी आय बँकेतील कर्मचाऱ्यांची ग्राहकांना व नागरीकांना असभ्य वागणुक
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
सध्या तालुक्या सहीत राज्यात महाराष्ट्र शाशना तर्फे महिला, शेतकरी, व राज्यातील जनते साठी अनेक कल्याण कारी योजना अमलात आणल्या असुन या सर्व योजनेचा फायदा खऱ्या अर्थाने नागरिकांना व्हावा म्हणुन राज्य शासनाने थेट लाभार्थ्यांना आर्थिक लाभ व्हावा म्हणुन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजने संबंधी राशी रक्कम जमा होत आहे त्यातल्या त्यात माझी लाडकी बहीण योजना राज्यात खुपचं लोकप्रिय झाली असुन या योजनेची जमा राशी थेट महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने महिलांना आनंद होत आहे परंतु त्या आनंदात बँकेत गर्दी व कामाचा ताण होत असल्याचे व या योजनेला बँक कर्मचारी ओझ मानत असल्या कारणाने महिला, पुरुष व इतर कामा संबंधी जात असलेल्या नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडिया येथील कर्मचारी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत लाडकी बहीण योजना संबंधी महिला बँकेत जात असताना त्या महीले सोबत सुद्धा अशीच वागणुक मिळत आहे तर त्यांच्या सोबत उध्टत बोलत असल्याच्या अनेक तक्रारी प्रसार मध्यामां समोर येत आहेत म्हणून याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी एक नागरीक म्हणून बँकेत गेले असतां त्यांनाच याची खात्री झाल्याने थेट शाखा व्यवस्थापक याना विचारणा केली असता शाखा व्यवस्थापक यांनी सांगितले की मी माझ्या कामा सहीत कर्मचारी, ग्राहक,बँक संबंधी तक्रार दार यांच्यावर लक्ष ठेऊन आहे जर बँकेतील कोणी कर्मचारी उद्धट वर्तन करत असेल तर आधी त्यांना समज देईल आणि तरीही अशीच परिस्थिती राहली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार
परंतु राज्य शासन व जिल्हा अधिकारी यांनी योजने संबंधी किंवा इतर कारणास्तव ग्राहकांना विनाकारण मनस्ताप खपून घेणार नसल्याचे सर्व बँकांना तसे कडक आदेश देण्यात आले तरीही जर राज्य शासन व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली अंजनगाव सुर्जी बँका दाखवत असल्याचे निदर्शनात येत आहे.
या वर शासन प्रशासन काय कार्यवाही करणार या कडे सर्व नागरिकांचे व महिलांचे लक्ष लागले आहे.