दर्यापूर तालुक्यातील ग्रा.पं. येवदा, सासन बु. , अडुळा बाजार या ठिकाणी खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक

*दर्यापूर तालुक्यातील ग्रा.पं. येवदा, सासन बु. , अडुळा बाजार या ठिकाणी खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकूण ₹ ६ कोटी २५ लक्ष ७७ हजार एवढ्या विकास निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात प्रामुख्याने – येवदा रस्त्यावरील सा.क. ०/१६० लहान पुलाचे बांधकाम करणे.

, MDR-15 ते सासन (बु) ते अडुळा ते रामा २७८ ते म्हैसपुर रस्त्यावरील सा.क्र. ०/३०० लहान पुलाचे बांधकाम करणे , येवदा ते घोडचंदी (अडुळा) ते रामा- २७८ रस्त्यावरील सा.क. ६/१७० लहान पुलाचे बांधकाम करणे या विकास कामांच्या भूमिपूजनाचा समावेश आहे. यावेळी प्रामुख्याने – मा. सुधाकरभाऊ भारसाकडे ( अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , मा. बाळासाहेब हिंगणीकर ( माजी सभापती जि.प. अमरावती ) , मा. सुनीलभाऊ गावंडे ( सभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , मा. प्रदीपभाऊ देशमुख ( माजी सभापती पं.स. दर्यापूर ) , सौ. वंदनाताई करूले ( माजी सदस्य जि.प. अमरावती ) , सरपंच , उपसरपंच , ग्रा.पं. सदस्य आणि स्थानिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. याप्रसंगी येवदा, सासन बु. , अडूळाबाजार येथील गावकऱ्यांनी होत असलेल्या विकास कामांन बद्दल आनंद व्यक्त केला.*

 

Spread the love
[democracy id="1"]