राज्यात लाडका शेतकरी योजना सुरु करा प्रहार पक्षाचे शाम धुमाळे यांची मागणी

राज्यात लाडका शेतकरी योजना सुरु करा

प्रहार पक्षाचे शाम धुमाळे यांची मागणी

उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत

संपुर्ण राज्य भरासह अंजनगाव सुर्जी तालुक्यात तसेच जिल्ह्यात गेल्या महिना भरा पासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने जिल्हा व तालुक्यातील फळ बागांसह इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे. सण उत्सावांच्या दिवसांत आपण कसे जगावे? हा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारने ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, शासनाने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लाडका शेतकरी’ योजना सुरू करावी तसेच पिकांना हमीभाव देऊन, अंजनगाव सुर्जी तालुक्यासह जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करुन फळ बागेला हेक्टरी 1.5 लाख व इतर पिकांच्या नुकसानाला हेक्टरी 1 लाख अशी शेतकऱ्यांना मदत तात्काळ द्यावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष शाम धुमाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]